कलेच्या माध्यमातून मुलांचे ज्ञान वाढेल, कला आणि हस्तकलेमुळे होणारे हे 6 फायदे जाणून घ्या.
1 . तुमच्या मुलांना चित्रकला आणि हस्तकला यांमध्ये आवड आहे का? 2. त्यांची ही आवड चुकीची आहे असं तुम्हाला वाटतंय का? 3. या कलांमुळे मुलांचा वेळ वाया जातोय असं तुम्हाला वाटतंय का? यातील एका जरी प्रश्नाचं उत्तर हो असेल तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे. कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून मुलांमध्ये एकाग्रता, रंग आणि अक्षरांची समज तसेच सर्जनशीलता विकसित होते. 4-5 वर्षे ते 10-12 वर्षे वयोगटातील मुले जेव्हा पर्यावरणाशी निगडीत क्राफ्ट किंवा चित्र काढतात तेव्हा त्यांची निसर्गाविषयीची समज आणि संवेदनशीलता वाढते तसेच त्यांना विचार करण्याची नवी दृष्टी मिळते, जे त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मुलांना कलेकडे प्रोत्साहन दिले पाहिजे. कला आणि हस्तकलेतून त्यांना कोणते फायदे मिळतात आणि या सर्वांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो हे या ब्लॉगद्वारे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी उचिता थोरवत-संत. किड्स क्रिएटिव्हिटी एक्स्पर्ट आणि 'The Craft Shala' या प्लॅटफॉर्मची निर्माती. हस्तकलांना लहान मुलांच्या माध्यमातून जिवंत ठेवून या हस्तकला जगापर्यंत पोहोचवणं आणि मुलांना त्यांच्या या छ...