चला हस्तकला समजून घेऊया - भाग ४
बहु असोत सुंदर संपन्न की महा | प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा || आपल्या महाराष्ट्र राज्याला समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. आपल्या या महाराष्ट्र राज्यात अनेक रत्नांनी जन्म घेतला आणि आपल्या गुण, शौर्य, ज्ञान, कर्तबगारी व सकारात्मक विचारांनी महाराष्ट्राला एक वेगळी ओळख दिली. आपला महाराष्ट्र डोंगरदऱ्यांनी, किल्ल्यांनी, निसर्ग सौंदर्या, प्राचीन लेणी या सर्वांनी नटलेला आहे. महाराष्ट्र प्रथा-परंपरा, निसर्ग सौंदर्य, खाद्यपदार्थ, संस्कृती या सर्व बाबतीत संपन्न आहे. त्याचप्रमाणे हस्तकलांच्या बाबतीतही महाराष्ट्राने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तुम्हाला महाराष्ट्रावर नितांत प्रेम आहे का..? तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रसिद्ध हस्तकला जाणून घ्यायच्या आहेत का..? या प्रश्नांची उत्तरं 'हो ' असतील तर हा ब्लॉग तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी शोभा थोरवत. किड्स क्रिएटिव्हिटी एक्स्पर्ट आणि The Craft Shala या प्लॅटफॉर्मची निर्माती. हस्तकलाना लहान मुलांच्या माध्यमातून जिवंत ठेवून या हस्तकला जगापर्यंत पोहोचवणं आण...