चला हस्तकला समजून घेऊया - भाग २
हस्तकला म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक हँडमेड गोष्टी दिसायला लागतात. अगदी कल्पकतेने हाताने बनवलेल्या त्या सुंदर वस्तू आपल्याला आकर्षित करतात. प्रत्येक भागाची हस्तकलेच्या बाबतीत वेगवेगळी खासियत आहे आणि त्यामागे खूप मोठा इतिहास देखील आहे.
नमस्कार, मी शोभा थोरवत. किड्स क्रिएटिव्हिटी एक्स्पर्ट आणि TheCraft Shala या प्लॅंटफॉर्मची निर्माती. हस्तकालांना लहान मुलांच्या माध्यमातून जिवंत ठेवून या हस्तकला जगापर्यंत पोहोचवणं आणि मुलांना त्यांच्या या छंदाचे रूपांतर त्यांच्या व्यवसायात करण्यासाठी प्लॅटफॉर्म निर्माण करणं हा माझा ध्यास आहे.
प्रत्येक गोष्टीमागे एक संघर्ष असतो आणि त्या संघर्षातून बाहेर पडून ती गोष्ट आपल्या मागे एक इतिहास ठेवून जाते. असाच हस्तकलेचा देखील एक इतिहास आहे. हस्तकला जगासमोर आणण्यामागे एक लढाई आहे. तुम्हाला हस्तकलेचा जागतिक इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
हस्तकला या देशाची संस्कृती, परंपरा आणि वारसा दर्शवतात. हस्तकलेतून निर्माण झालेल्या वस्तू या कलात्मक, उपयुक्ततावादी, सर्जनशील, पारंपारिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या संलग्न असतात. हस्तकला त्या त्या भागाच्या किंवा देशाच्या संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत असतात.
हस्तकला त्या त्या भौगोलिक क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या वस्तू, साधने, तेथील संस्कृती, राहणीमानाच्या पद्धती, वातावरण या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतात व याच गोष्टींतून त्या निर्माण होत असतात.
अगदी प्राचीन काळापासून हस्तकला अस्तित्वात आहे. त्यात काही बदल होत गेले तसेच नवनवीन हस्तकलांचा शोध लागला. हस्तकलांमध्ये बनत असलेल्या वस्तू या हातांनी बनवल्या जात असल्याने कलाकारांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कलाकारांची कल्पकता, सर्जनशीलता, शारीरिक ऊर्जा त्यांचा कस लागतो. त्यामुळे त्यांनी बनवलेल्या वस्तूंना योग्य मोबदला मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले.
हस्तकला या शब्दाचा सर्वात प्रथम वापर टी. जे. कोबडेन - सैंडरसन यांनी १८८७ मध्ये कला आणि शिल्प यांच्या एका प्रदर्शनात केला होता. १८८० ते १९२० च्या दरम्यान युरोप, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया मध्ये कला आणि कलाकुसर चळवळीचा उगम झाला. हस्तकलांमध्ये नाविन्यता आणणे व सामाजिक बदल घडवून आणणे हा या चळवळी मागचा मुख्य उद्देश होता. ही चळवळ ए.डब्ल्यू. एन पुंगीन, विल्यम मॉरीस, जॉन रस्किन यांच्या विचारांद्वारे प्रेरित होती. जपानमध्ये ही चळवळ १९२० च्या दशकात मिंगेई आंदोलनाच्या रूपात पुढे आली. हे आंदोलन हस्तकलेमधून निर्माण झालेल्या वस्तूंमध्ये आर्थिक आणि सामाजिक सुधारणा घडवून आणणे यासाठी होते.
कला व कलाकुसर चळवळीतून अनेक उपक्रमांना सुरुवात झाली. जसे की किशोरावस्थेतील मुले एखाद्या कुशल कारागीराकडे जाऊन कमी वेतनाच्या बदल्यात त्यांच्याकडून त्यांची कौशल्य शिकून घेत. तसेच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत ते स्वतःचा व्यवसाय करण्यास तयार झालेले असत आणि त्याच कौशल्याच्या आधारावर ते स्वतःचा व्यवसाय सुरू करत आणि आपले जीवन जगत असत.
परंतु औद्योगिक क्रांती आणि उत्पादन प्रक्रियेच्या वाढत्या यांत्रकीकरणामुळे हळूहळू व्यावसायिक कारागिरांना बाजूला करण्यात आले. हाताला काम नसल्याने त्यांच्याकडे कौशल्य असूनही ते हस्तकलेपासून दूर झाले. याचा परिणाम बऱ्याच हस्तकला नष्ट होण्यावर झाला.
पण आजच्या काळात छंद, आवड, लोककला जपण्याचा प्रयत्न या सर्वांमुळे हस्तकलांचे प्रमाण पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे, आता पारंपरिक आणि आधुनिक यांचा मेळ घालत देखील अनेक नव्या हस्तकला जन्म घेत आहेत, परंतु काही लोकांचा पारंपरिक हस्तकला निर्मित वस्तू घेण्यावर भर आहे तसेच या वस्तू लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत देखील आहेत. त्यामुळे त्या त्या देशाची प्रदेशाची परंपरा व संस्कृती जपली जात आहे. भारत, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया हे देश हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहेत.
संपूर्ण जगामध्ये भारत देशाला हस्तकलेचा मोठा वारसा लाभला आहे. तसेच भारतातील प्रत्येक भौगोलिक प्रदेशातील हस्तकलेच्या मागे एक मोठा इतिहास लपलेला आहे.
आपण या ब्लॉगमध्ये कला व कलाकुसर चळवळ तसेच हस्तकलेचा जागतिक इतिहास या गोष्टी पाहिल्या.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ? तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला गे कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्हाला तुमच्या मुलांना हस्तकला शिकवायच्या असतील व हस्तकलेसंबंधी अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर 'The Craft Shala' ही कम्युनिटी जॉईंट करा. माझा ब्लॉग संपूर्ण वाचल्याबद्दल मी आपली आभारी आहे.
Woooow khup chan Shobha...keep it up....very informative
उत्तर द्याहटवाKhup informative
उत्तर द्याहटवाखुप छान लिहिलंय, ह्यातला काही भाग - काही वाक्यं, माझ्या विषयासाठी, शिवणकलेसाठी साठी लागू होतात..thank you
उत्तर द्याहटवा